फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील बाबरा येथील प्रतीक्षा अनिल पवार हिने नुकत्याच झालेल्या पोलीस अधीक्षक कार्यालय, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई भरती २०२४-२५ मध्ये आपल्या मेहनती, जिद्द व चिकाटीच्या बळावर पोलीस दलात भर्ती होऊन यश मिळविले. या यशामुळे गावकऱ्यांनी तिचे कौतुक करीत व परिवासह सत्कार केला आहे.
यावेळी प्रभाकर वाघ,राजेंद्र चव्हाण, कचरू मैंद, धनंजय महाजन, अनिल चव्हाण,आप्पाराव चव्हाण, बबन चव्हाण, प्रकाश मैंद, अमोल खिल्लारे, पंढरीनाथ मैंद, शिवाजी पवार, दामू बर्डे, सतीश काळे, सुभाष मरकडे,मानसी हिवाळे. इत्यादी गावकरी उपस्थित होते.










